सोलापूर -: यंदाचे वर्ष हे चित्रपट निर्मितीच्या शताब्दीचे वर्ष असून यानिमित्त राज्यशासनाच्या सांस्कृतिक विभागाने पुरस्कार प्राप्त पाच लघुपट व पाच माहितीपटाचे मोफत प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला असून याच्या यशस्वी आयोजनासाठी करमणूक कर अधिकारी रामलिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
भिंतीमागे, मुक्ती, कातळ, विवर, कोलाज, हे पुरस्कार प्राप्त लघुपट तर देवराई, सावित्री, व्ही बाबासाहेब, मन्माया, मुंबईचे रेल्वे फेरीवाले, हे पुरस्कार प्राप्त माहितीपट रसिकांना मोफत दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे स्थळ व दिनांक लवकरच जाहीर करण्यात येतील अशी माहिती श्री.चव्हाण यांनी दिली.
या आढावा बैठकीसाठी सहाय्यक करमणुक कर अधिकारी व्ही.आर पोतदार, करमणुक कर निरीक्षक उमाकांत लोंढे, ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे, ज्येष्ठ कलावंत दिपक कलढोणे, अमोल चाफळकर, सुनील गुरव, रवी मालपुरे, प्रा.ऋतुराज बुवा, मनपाचे दत्तात्रय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.