पुणे -: अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
सकाळी फिरायला गेले असताना, दाभोलकर यांच्यावर ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,अंदाजे २५ ते २६ वर्षाचे दोन इसम हिरो होंडा बाईकवरुन आले आणि त्यांनी दाभोळकर यांच्यावर चार राऊंड्स झाडल्या. त्यातील दोन गोळ्या त्यांच्या मानेला लागल्याने ते जागीच कोसळले. तेथून त्यांना तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरो होंडा गाडीची नंबर प्लेट पोलिसांच्या हाती लागली आहे. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी तर दुस-याच्या पाठीवर बॅग होती. त्यानंतर हल्लेखोर रविवारपेठेच्या दिशेने रवाना झाले, अशी माहिती मिळाल्याने आता त्या दिशेने तपासाची सूत्रे फिरु लागली आहेत. या हल्ल्यामागचे नेमके काय कारण आहे, याचा शोध पुणे पोलिस घेत आहेत.
दरम्यान, दाभोळकर हे सोमवारी रात्री दहा वाजता मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास साधना साप्ताहिक कार्यालयात पर्यावरण पूरक गणपती विसर्जन या विषयावर पत्रकार परिषद होती. त्यानंतर ते दुपारी चार वाजता त्यांच्या गावी साता-याला जाणार होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला. ज्येष्ठ विचारवंत दाभोलकर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात जादुटोणा विरोधी विधेयक मंजूर करण्यात यावे, यासाठी लढत होते. साधना साप्ताहिकचे ते गेल्या १६ वर्षांपासून संपादक होते. साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात दाभोलकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. साता-यात त्यांच्या गावी दाभोळकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हल्ला करणा-या हल्लेखोरांची माहिती देणा-यास १० लाख रुपयांचे इनाम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे.
बाबाबुवांकडून नाडल्या जाणा-या महाराष्ट्रातील जनतेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची ज्ञानज्योत पेटावी आणि डोळसपणा जागृत व्हावा यासाठी जी नामवंत मंडळी कार्यरत आहेत त्या प्रभावळीत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्थान फार वरचे आहे. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे लढा देत आहे.
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांची हत्या म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा गळा घोटणं हा गुन्हा आहे. दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून समाजातील रुढी,अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आग्रही राहिले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा पारित व्हावा यासाठी त्यांनी कधीही अताताई भूमिका घेतली नाही. नेहमीच सामंजस्याने ते आपली भूमिका मांडत राहिले.- पृथ्वीराज चव्हाण,मुख्यमंत्री
महाराष्ट्राला शरमने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. समस्त जगाला संदेश देणारा महात्मा गांधींचा प्रवाह आजही महाराष्ट्रात आहे. त्याच प्रवाहातले दाभोलकर होते. जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी दाभोलकरांनी आपले आयुष्य वेचले. मात्र राजकर्ते अंतर्मुख झाले नाहीत. राज्यकर्त्यांनी आपण नेमके काय करतो आहोत हे आवर्जून पहावे. त्यांना सत्येची शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांच्या परंपरेला ही घटना लज्जास्पद आहे. जिथे सतीचा कायदा करणे शक्य आहे तिथे जादूटोणा विरोधी कायदा का होत नाही? डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अशा प्रकारे मृत्यू यावा ही बाब निंदनीय आहे. - एन.डी पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शेकापचे अध्यक्ष
नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनाने सामाजिक विषयावर सातत्याने काम करणारा कार्यकर्ता हरपला आहे. आज दाभोळकरांसारखे कार्यकर्ते दिसत नाहीत. ते एखाद्या पक्षाच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हते. जादूटोणा विरोधी कायदा व्हावा हा त्यांचा आग्रह योग्यच होता.मात्र काही समाजकंटकांना त्यांचा हा आग्रहच आवडलेला नाही. अशा रितीने त्यांचा मृत्यू व्हावा हे दूर्दैवी आहे. – नरेंद्र चपळगावकर, निवृत्त न्यायमूर्ती
पुरोगामी महाराष्ट्र आता उरलेलाच नाही. दाभोलकरांची हत्या होणं हे दुर्दैवी आहे. – अनंत दिक्षीत, ज्येष्ठ पत्रकार

नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांना तात्काळ शोधून काढा. – अजित पवार, उपमुख्यमंत्री
* साभार - दै. प्रहार