उस्मानाबाद -: उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची वास्तू प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उभारण्यात आली असून अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी त्यासाठी आपले योगदान दिले आहे. विस्तारीत पत्रकार भवनासाठीसुध्दा अशाचप्रकारे सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष यांनी केले.
उस्मानाबाद येथील पत्रकार भवनामध्ये सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी पत्रकार भवनाच्या 22 व्या वर्धापनादिनानिमित्त पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ पत्रकारांच्या सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव तर सचिव राजाभाऊ वैदय, सहसचिव प्रशांत कावरे, प्रांतप्रतिनिधी विजय मुंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलाताना जाधव म्हणाले की, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पत्रकार भवन हे मराठवाडयातील पहिले पत्रकार भवन असून त्याची उभारणी 1991 साली करण्यात आली. अनेक अडचणींना सामोरे जावून हे पत्रकार भवन उभारण्यात आले असून यासाठी अनेक पत्रकारांनी प्रयत्न केले. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघास नवीन विस्तारीत पत्रकार भवनासाठी शासनाने जागा दिली असून त्या पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. येत्या तीन वर्षात हे भवन उभारण्यात येणार असल्याचेही संतोष जाधव यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पत्रकार भवनच्या उभारणीसाठी योगदान दिल्याबददल ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश हंबीरे, शिला उंबरे, महादेव नरोटे, दिलीप पाठक-नारीकर, श्रीराम मोदाणी, मोतीचंद बेदमुथा, नंदकिशोर भन्साळी यांचा सत्कार करण्यात आला. संघाचे सचिव राजाभाऊ वैदय यांनी पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी दिलीप पाठक-नारीकर, भाऊसाहेब भन्साळी, श्रीराम मोदाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास राम खटके, प्रवीण पवार, सचिन मोरे, श्रीराम क्षिरसागर, अजिंक्य माने, राहुल कोरे, सचिन चंदनशिवे, किशोर माळी, लक्ष्मीकांत बनसोडे, अमजद सय्यद, विक्रम पाठक, बिभीषण लोकरे, दिपक लोंढे, अमित आडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.