बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: जागतिक फोटोग्राफर्स दिनाचे औचित्य साधून बार्शी फोटोग्राफर्स असोसिएशनच्यावतीने येथील बायपास जवळील रवि फौंडेशनच्या वृक्ष लागवड व संवर्धन केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे ग्रामदैवत श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिध्द सिने छायाचित्रकार विकास इंगळे, ज्येष्ठ पत्रकार रवि मुलगे, अशोक कांबोज, अनिल देवधानुरकर, भाऊ समेळ, किशोर मनगिरे, असोसिएश्नचे अध्यक्ष ओंकार चंद्रशेखर, सोमनाथ सगरे, खजिनदार विवेक पराते, गौरीश रकटे, प्रविण थोरात आदीजण उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गावरुन सुमारे 125 छायाचित्रकारांनी दुचाकीवर रॅली काढून बायपास जवळील रवी फौंडेशन्चया आवापरात वृक्षरोपन करण्यात आले. वृक्षरोपनानंतर प्रमुख पाहुणे विकास इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी प्रास्ताविक केले.
बार्शीतील छायाचित्रकारांनी आपल्या कला अविष्कारातील टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन झाले. यातून उत्कृष्ठ छायाचित्रांची निवड करण्यात आली. प्रविण थोरात यांनी आपल्या कॅमेरामधून टिपलेले रात्रीच्या वेळी अंधारता चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करणा-या विदयार्थ्याच्या छायाचित्रास प्रथम क्रमांकासाठी निवडण्यात आले. रविंद्र यांनी आपल्या कॅमेरामधून टिपलेले छायाचित्र द्वितीय क्रमांकासाठी तर राजेश वानखेडे यांनी नृत्यांगणेचे नृत्य करतांना हवेत टिपलेल्या छायाचित्रास तृतीय क्रमांकासाठी निवडण्यात आले.