मुंबई :- ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असूनत्यांच्या निधनाने ज्येष्ठ विचारवंत, अध्यात्माचे गाढे अभ्यासक, सच्चा गणेशभक्त आणि हिंदू संस्कृतीचा चालता बोलताविश्वकोश, असं बहुआयामी व्यक्तिमत्वआज काळाच्या पडद्याआड गेलं आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
साळगावकर हे ज्योतिष आणि अध्यात्म शास्त्राचे अभ्यासक होते. हिंदू चाली-रीतींच्या मागे दडलेल्या कारणांचा ऊहापोह करण्याची त्यांची क्षमता होती. थोर विचारवंत, सिद्धहस्त लेखक, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकभूमिकांमध्ये ते लीलया वावरले. `कालनिर्णयकार` ही त्यांची मुख्य ओळख ठरली. ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेच्या माध्यमातून त्यांचे विचार घराघरांत पोहचले. मराठीसह विविध भाषांमधूनही त्यांनी कालनिर्णय प्रकाशित केले.कालनिर्णयच्या खपाचा विक्रम प्रस्थापित करून त्यांनी आपल्यातील कल्पक उद्योजकाचे कौशल्य सिद्ध केले.
विविध सामाजिकसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी नेतृत्व कौशल्याचाही ठसा उमटविला. सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक अशा अनेक विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांमध्ये विपूललेखन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील गणेशोत्सव चळवळीला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ज्योतिर्भास्करांना अपेक्षित असलेल्या विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.