मुंबई -: कुलाबा येथे नौदल डॉकयार्डमध्ये आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात अधिकारी आणि जवानांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
नौदलाच्या ताफ्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा या पाणबुडीवर झालेल्या या दुर्घटनेविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले आहे. आज दुपारी संरक्षण मंत्री ए. के. अॅन्टोनीतसेच मुख्यमंत्र्यांनी डॉकयार्डला भेट दिली आणि अपघातस्थळाची पाहणी केली, शिवाय जखमींची विचारपूसही केली.
या घटनेनंतर रुग्णालये, पोलीस, अग्निशमन या सर्वांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नौदलाला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगीतले.