सोलापूर :- पुढील पाच वर्षातील जिल्हा परिषदेचा खर्च आणि उत्पन्न याचे अंदाजपत्रक वित्तीय तुटीसह वित्त आयोगास त्वरीत पाठविण्याच्या सुचना चौथ्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी दिल्या.
    जिल्हा परिषदेत डांगे यांनी आज शुक्रवार दि. 30 ऑगस्ट रोजी वित्तीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, परिविक्षाविधीन आय.ए.एस.अधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख उपस्थित होते.
     बैठकीत सूचना करताना डांगे म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित होणा-या सर्व योजनांसाठी लागणारा खर्च, जिल्हा परिषदेचे उत्पन्न आणि मिळणारा आर्थिक निधी यांचा ताळमेळ वित्त आयोगाने पाठविलेल्या सहपत्र दोन मध्ये दिलेल्या 1 ते 10 मुद्यांनुसार सप्टेंबर 2013 अखेर पर्यंत कळवावे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायत यांना विविध विभागातील इमारती, रस्ते किंवा अन्य अनुषंगिक बाबींकरीता लागणारा देखभाल खर्चही कळविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सहपत्र दोन पाठविण्यास टाळाटाळ करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचेही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना सूचीत केले.
    बैठकीतकासार यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती दिली.
 
Top