उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत  राष्ट्रीय अभ्यासक्रम एन सी एफ 2005 च्या आधारे/ एन सी ई आर टी च्या मार्गदर्शक  तत्वानुसार अभ्यासक्रम आरखडा 2010 एस सी एफ-2012 तयार करण्यात आला असून या मसुदयास शासनाची मान्यता मिळाली आाहे.  शैक्षणिक वर्ष 2012-13 पासून इ. 9 वी व इयत्ता 11 वी साठी शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून इयत्ता 10 वी व 12 साठी पुर्नरचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळाली आहे.
            इ. 11 वी व 12 वीसाठी भाषेतर विषयाची इंग्रजी व मराठी माध्यम सोडून उर्वरीत माध्यमिकाची पाठय पुस्तके मंडळ तयार करीत नसल्याने व मंडळ स्तरावर त्याची कार्यवाही करणे शक्य नसल्याने ती पाठयपुस्तके भाषांतर करण्याची परवानगी जाहिररित्या खाजगी प्रकाशकांना देण्यात येत आहे.
          इ. 11 वी व 12 वीसाठी सदर पाठयपुस्तके भाषांतरीत करताना मंडळाची मराठी व इंग्रजी माध्यमांची पुस्तके प्रमाणित मानावीत.  इ. 11 वी व 12 वीसाठी ची पाठयपुस्तके भाषांतराची तसेच ती तपासून घेण्याची पूर्ण जाबदारी संबधित प्रकाशकांची राहील. याबाबत मंडळ स्तरावर कोणतीही कार्यवाही होणार नाही तसेच मंडळाकडून त्यास शिफारस / मान्यता देण्यात येणार नाही व खाजगी प्रकाशकांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही. त्यामुळे पाठयपुस्तकातील कोणत्याही मजकूराचा दर्जेदार भाषांतराची जबाबदारी सर्वस्वी  खाजगी प्रकाशकांची राहील.
         मुळ पाठयपुस्तकातील वापरण्यात येणाऱ्या चित्राकृती किंवा आलेख यांची चूकीची छपाई झाल्यास त्यास राजय मंडळ जबाबदार राहाणार नाही तसेच चित्राकृती संदर्भात राज्यमंडळाचे सर्व मालकी हक्क अबाधीत राहतील. सदर पुस्तकातील मुळ मजकुराचा दुरुपयोग होणार नाही या अटीवर पाठयपुस्तके भाषांतर करण्यास मान्यता देण्यात येईल, असे मंडळाचे सचिवांनी कळविले आहे.
 
Top