नळदुर्ग -: जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय व तुळजापूर तालुका क्रिडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय सांघिक कबडडी स्पर्धेत चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विदयालयच्या मुलींच्या संघाने अनुक्रमे 14 व 17 वर्षे वयोगटातून प्रथम क्रमांक मिळविला
तुळजापूर येथील क्रिडा संकुलात घेण्यात आलेल्या शालेय कबडडी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील श्री भैरवनाथ विदयालयाच्या मुलींच्या संघाने श्री मेसाई विदयालय जवळगा (मे.) शाळेच्या संघाचा पराभव केला तर 17 वर्षे वयोगटातील इंदिरा गांधी कन्या प्रशाला मंगरुळ या शाळेच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव करुन श्री भैरवनाथ माध्यमिक विदयालयाचा संघ विजेता ठरला. विजेत्या संघास क्रिडा शिक्षक व्ही.टी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तर संघनायिका म्हणून या विजेत्या संघाचे कु. पुनम माटे व कु. पदमीन गायकवाड या विदयार्थीनीनी नेतृत्व केले. या यशस्वी खेळाडूंचे कै. देवरावजी चव्हाण शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, सचिव प्रकाश जगदाळे, उपाध्यक्ष धोंडिबा काळुंके, संचालक लक्ष्मण गायकवाड, विदयालयाचे मुख्याध्यापक पी.एस. पवार, सहशिक्षक बी.के. कानडे, एम.डी. गरड व ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.