बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील दिनकर रुद्राके यांच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाच्या परिचय मेळावा होत आहे. 1 सप्टेंबर रोजी वीरशैव विदया संवर्धिनी मंडळाचे लिंगायत बोर्डिंग सभागृह येथे हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात विधवा, विधुर, प्रौढ, घटस्फोटीत इत्यादींकरीता आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक दिनकर रुद्राके यांनी सांगितले.
    वीरशैव समाजाच्या सर्व पोटजातींकरीता सर्वांसाठी एप्रिलमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या मेळाव्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर दि. 1 सप्टेंबर रोजी दुस-या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाममात्र नोंदणी शुल्कामध्ये वेबसाईटकरीता वधू वरांची संगणकीय नोंदणी तसेच शाखेच्या 25 जिल्हयातील कार्यालयात नोंद करण्याची सुविधा वधू वर सुचक केंद्रामध्ये करण्यात आली आहे.
    यातून पैसे मिळविण्याचा उददेश नसून केवळ सामाजिक काम करण्याची आवड असल्याने आपक वधू-वर सूचकाचे काम करत असल्याचे रुद्रको यांनी बोलताना सांगितले. अधिक माहितीसाठी दिनकर रुद्राके मो. 9850431826, 9975943424 या क्रमाकांवर संपर्क साधावा.
 
Top