उस्मानाबाद -: महिला शिक्षिकेच्या तक्रारीवरून चालू असलेल्या चौकशी प्रकरणातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रभारी मुख्याध्यापकाकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना तुळजापूरचा शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत केशव चव्हाण यास अटक करण्यात आली. हा सापळा शनिवारी दि. 17 ऑगस्ट तुळजापूर शहरातील तालुका शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात यशस्वी करण्यात आला.
माळुंब्रा येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश शंकरराव कानडे यांच्या विरोधात त्याच शाळेतील एका सहशिक्षिकेने गैरवर्तन व मानसिक त्रास देत असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी गटविकास अधिकारी व दोन शिक्षण विस्तार अधिकारी अशा तीन महिला अधिकारी नेमण्यात आल्या. गटविकास अधिकार्यांनी या प्रकरणात तालुकास्तरीय चौकशी समिती नेमून शिक्षण विस्तार अधिकारी वाय. के. चव्हाण, केंद्रप्रमुख सोलनकर यांना चौकशीचा अहवाल सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी चव्हाण यांनी कानडे यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशी प्रकरणात त्यांना सुरक्षित बाहेर काढून, महिला शिक्षिकेची तक्रार खोटी ठरवून तिला निलंबित करण्याची शिफारस वरिष्ठांकडून करून देतो, असे म्हणून 25 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी मोबाइलवर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार कानडे यांनी संपर्क साधला असता त्यांना पाच हजार रुपये घेऊन उस्मानाबाद ते तुळजापूर मार्गावरील नारळीबाग धाब्यावर बोलविले व उर्वरित 20 हजार रुपये तीन- चार दिवसांत देण्यास सांगितले. याप्रकरणी कानडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार शनिवारी चव्हाण यांच्याशी संपर्क साधून रक्कम कोठे घेऊन यायची याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी चव्हाण यांनी तुळजापूर तालुका शिक्षक पतसंस्थेत येण्यास सांगितल्यानंतर दुपारी सापळा रचून 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर चव्हाण यांना पथकाने अटक केली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई उपाधीक्षक नय्युम हाश्मी, निरीक्षक व्ही. बी. सिद, एस. सी. राठोड, अश्विनी भोसले, कर्मचारी चंद्रकांत देशमुख, अश्विनकुमार जाधव, महादेव स्वामी, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, नितीन तुपे, बालाजी तोडकर व राजाराम चिखलीकर यांनी यशस्वी केली.