उस्मानाबाद -: ग्रामीण भागातील मुला-मुलींचे शिक्षण या भागात होण्यासाठी दर्जेदार व समाजउपयोगी शिक्षण देऊन त्यांच्या उज्वल भवितव्य घडविणे विषयक क्रीडा संकुल, व्यायामशाळा, नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमा सारखे प्रस्ताव संस्थेने सादर केल्यास त्यास मंजूरीसाठी प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
           दत्तू पाटील माध्यमिक विद्यालय, चिवरी ता.तुळजापूर येथील नुतन इमारत पायाभरणी व  व वृक्षारोपन यांच्या हस्ते झाले त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष व्हट्टे, तुळजापूर प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, कुलस्वामिनी सुत गिरणीचे चेअरमन अशोक मगर, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनिल चव्हाण, ज्ञानविकास शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा तथा पंचायत समिती सभापती मनिषा पाटील, कृषि व पशुसंवर्धन सभापती पंडीत जोकार, पंचायत समिती उपसभापती प्रकाश चव्हाण, ज्ञान विकास संस्थेचे संस्थापक  पोपटराव पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती.
          पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, दत्तु पाटील यांनी आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न कौतूकास्पद आहे. त्यामुळे या संस्थेतील विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण होत आहे. त्याचा वारसा यापुढेही जपावा,असे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले.
         शासनाच्या योजनेपासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी कार्यकर्त्यांनी योजनांचा अभ्यास करुन त्या ग्रामीण भागातील लोकांना समजावून सांगण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी करुन कृष्णा खोऱ्यांच्या निधीतून या भागातील करण्यात आलेल्या साठवण तलावातील पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे या भागातील सिंचन क्षमता वाढल्याने  शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्ध लक्षात घेऊन ठिंबक व तुषार सिंचनाद्वारे शेती करावी, असा मौलीक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
          डॉ.व्हट्टे म्हणाले की, शिक्षणाच्या सहाय्याने समाजाची निर्मिती करता येते. हे कार्य शाळेच्या खोल्यामधून करावे. शिक्षण संस्था उभारल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न सोडविण्याची सोय झाली असून केलेल्या शैक्षणिक कार्याचे त्यांनी कौतूक केले. चिवरी -इंदिरानगर-अणदूर या रस्त्यावरील पुलांच्या कामाचा समावेश पुढील कामे करतेवेळी केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
        याप्रसंगी अशोक मगर, अप्पासाहेब पाटील, राजलक्ष्मी गायकवाड यांची भाषणे झाली.
        याप्रसंगी जि.प.सदस्या पार्वतीबाई घोडके, छायाताई सोमवंशी, पंचायती समिती सदस्य मोक्षदा गोरे, कल्पना गायकवाड, डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, गटविकास अधिकारी तृप्ती ढेरे, सरपंच मंगल अशोक बिराजदार, उपसरपंच सुभाष जाधव, मुख्याध्यापक श्रीमती एल.के.बिराजदार  याची उपस्थिती होती.
        यावेळी गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रमोद मुळे यांनी केले तर आभार अनिल गायकवाड यांनी मानले.
 
Top