कळंब -: अज्ञात इसमाने एटीएम कार्ड मध्ये गैरप्रकार करुन 33 हजार रुपयाची रक्कम लंपास केल्याने एटीएम कार्ड धारकामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कळंब (जि. उस्मानाबाद) येथे बुधवार रोजी घडली.
बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे चार ते सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान रानोजी मनोहर शिंदे वय 63, रा. संभाजीनगर डिकसळ हे भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी गेले होते. रक्कम काढताना अडचण येत असल्याने त्यानी दुस-या एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. रक्कम काढून दिल्यानंतर त्यांचे एटीएम कार्ड त्यांना परत न देता दुसरेच कार्ड दिले. यानंतर त्या व्यक्तीने सायंकाळी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रावर जाऊन शिंदे यांच्या खात्यातून 33 हजार रुपये काढले. शिंदे यांना गुरुवार रोजी सकाळी आपल्या खात्यावरील 33 हजार रुपये काढल्याचा संदेश मिळताच त्यांनी कळंब पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे हे करीत आहेत.