कळंब -: येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या कळंब शाखेने शहरात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या मंदीरासाठी जागा मिळावी, अशी मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळंब शहरात संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे मंदीर नाही, त्यासाठी न.प. ने शहर हद्दीत जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी न.प. मुख्याधिकारी बोंदर यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कळंब तालुकाध्यक्ष गोपाळ वनकळस, सचिव मुकेश राऊत, सुदर्शन बेलगावकर, गणेश राऊत, सोमनाथ वनकळस, बाबा शिंदे, नितीन कांबळे आदीजण उपस्थित होते.