
या महाविद्यालयात प्रवेश करताच मनात उत्साह वाढविणारे भिंतीवरील सुविचार हे अनेकांचे विचार ज्वलंत करणारे आहेत. गोरक्षनाथ विद्यालयात जवळपास ३१ खेडेगावातुन विद्यार्थी शिक्षण घेण्यसाठी येतात. वांगी, शिवणी, घाटसावळी, गुंदा वडगाव, नाळवंडी यासारख्या छोट्या वस्त्यावरील विद्यार्थी या शाळेत, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येतात. या महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धेसाठी राज्यपातळीवर जात असताना त्यांचा पुर्ण खर्च हा महाविद्यायाचे प्राचार्य स्वता: करतात. त्यामुळे गरिब विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होतो. या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयबक्षीसे मिळवुन केवळ महाविद्यालयाचेच नव्हे तर बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचविले आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन
महाविद्यालयासह जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचवणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रिडा शिक्षक श्री रकडे यांच्यासह चौरे, थापडे, शिंदे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय पातळीवर मिळवलेली ३६ बक्षीसे
सन 2008 साली यवतमाळ येथे 3 बक्षीसे, सन 2009 साली पनवेल येथे 2 बक्षीसे, 2010 साली उस्मानाबाद येथे 3 बक्षीसे, 2011 साली एकूण सर्वाधिक 18 बक्षीसे मिळवले. 2012 साली 10 बक्षीसे मिळविले आहेत.
विदयार्थ्यांचे यश यातच समाधान - प्राचार्य सोमनाथ बडे
आमच्या महाविद्यायातील आतापर्यंत अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खेळण्यसाठी गेलेले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश यातच महाविद्यालयाला समाधान आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना कोणतीच गोष्ट कमी पडु देणार नाही.
शिक्षणाबरोबरच खेळाची आवड - लहु म्हेत्रे (विद्यार्थी)
मला अभ्यास करायला खुप आवडते मात्र लहानपणापासुनच कबड्डीची आवड असल्याने मी यामध्ये अनेकवेळा राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी पण गेलो आहे.
महाविद्यालयाची मदत - किशोर डोंगरे (विद्यार्थी)
मी अतिशय गरिब घराण्यातला आहे. मला बाहेरगावी खेळायला जायचे म्हटले की आर्थिक अडचणी यायची, मात्र महाविद्यालयाने माझा खेळ पाहुन मला संपुर्ण आर्थिक मदत केली म्हणुनच मी आज यशस्वी झालो आहे.