आज सोशल नेटवर्कचे मुख्य साधन म्हणजे फेसबुक. फेसबुक मुळे आपल्याला देशात घडणार्‍या घटनेसह आपण आपले विचार फेसबुकच्या माध्यमातुन लोकांपर्यंत पोहचवु शकतो. परंतु आज फेसबुकने वेगळेच वळण घेतले आहे. कोणी याचा वापर चांगल्या कामासाठी करतात तर कोणी वाईट. काही लोक तर फेसबुकवर अश्‍लील भाषेसह विविध लंच्छणास्पद फोटो अपलोड करतात. फेसबुकच्या माध्यमातुन सर्व काही वाईटच घडते असे मुळीच नाही. कारण याच फेसबुकवर अनेक सुशिक्षीत, विचारवंत, सामाजिक कार्य करणारे, राजकीय नेते, तरुण, तरुणी, विद्यार्थी, विद्यार्थीनी याला जोडलेले असतात. फेसबुकमुळे माझ्या एका जिवलग मित्राच भलं झालं. आज या फेसबुकमुळेच त्याची एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका मुलीशी ओळख झाली. ज्याला फेसबुक बद्दल काहीच माहित नव्हते तो आज रात्रं-दिवस फेसबुकवर बसलेला असतो. का अन् कोणास ठाऊक पण तिला सुद्धा असे वाटत होते की याने सुद्धा सारखे ऑनलाईन रहावे. दोघांची मन बोलण्या-बोलण्यातुन ते एकमेकांच्या खुप जवळ आले. दोघांनीही एकमेकांना फक्त फेसबुक वालच्या फोटोशिवाय प्रत्यक्षात पाहिलेच नव्हते. तो आज एका जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहे तर ती मेट्रो सिटीच्या ठिकाणी शिक्षण घेत आहे.. एक विषेश आहे अन् ते म्हणजे दोघेही एकाच माध्यमाचे शिक्षण घेत आहेत.
    एक दिवस ते भेटले अन्...... दोघांनीही फक्त फेसबुकवरच पाहिल्याने एकमेकांना ओळखायला फार अवघड गेले नाही. एकमेकांना पाहताच... दोघांनाही एकमेकांकडे किती पहावे हेच समजत नव्हते. अन् काय दोघांनाहीं एकमेकांककडे पहात असताना समोर एक मोठा आणि चांगला कार्यक्रम चालु आहे याचे भानच राहीले नाही.
    एकदिवस तिच्या कॉलेजमध्ये एक चांगला कार्यक्रम असल्याचे सांगितले. ती एवढ्यावरच थांबली नाही तर या कार्यक्रमाला येण्याचा हट्टच धरुण बसली. त्यालाही तिला भेटायची ओढ...अन् तिलाही... मग काय त्याने कार्यक्रमाला येण्‍याचे ठरवले. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर दिल्यामुळे ते आधुनमधुन फोन वर बोलत रहायचे. त्याने येथुन कार्यक्रमाला निघताच  तिला मोबाईलद्वारे मेसेज केला. पण तिचा रिप्लायच आला नाही. मग त्याने कॉल करण्याचा प्रयत्‍नही केला. मात्र तिचा फोन नॉट रिचेबल सांगु लागला. हा हाताश झाला. आता करायचे काय? हा प्रश्‍न त्याच्यासमोर पडला. मग त्याच्या त्याच सिटीतील एका मित्राला बोलावुन घेतले. त्याने विचारले अरे असा अचानक कसे काय येणे केले. पण खरं उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे देत त्याला खोट बोलला. दुपारचे दोन वाजले. तिचा फोन आणखीही लागत नव्हता. अचानक २.१५ ला तिचा मेसेज आला. कॉल मी. याने लगेच कॉल केला. तिने लगेच उचलला अन् सॉरी बोलली. तिच्या महाविद्यालयातील फन्‍शन हॉलमध्ये मोबाईलला नेटवर्कच नव्हते. तो अन् त्याचा मित्र त्या महाविद्यालयाच्या आत जाताच त्याला त्याच महाविद्यालयातील फेसबुकवरीची अनेक मित्र भेटले. मग आता त्याच्या थोडा जिवात जिव आला होता. मात्र त्याला ती आणखी कोठे दिसत नव्हती. ती फक्त याला मेसेज करुन सांगायची की फन्‍शन हॉलमध्ये ये. हा तेथे गेला तरी ती कोठेही दिसायला तयार नव्हती. मग तिनेच पाच मिनिटाने मेसेज केला की कोठे आहेस तु. मग याने सांगीतले मध्यभागी पाचव्या ओळीत. तिने लगेच रिप्लाय मी तुझ्या पाठीमागच्याच शिटवर आहे. काय कार्यक्रम सुरु झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मार्गदर्शन झाले. आता लगेचच कार्यक्रला माला सुरुवात होणार होती. भाग दोन लवकरच आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करु......
सोमनाथ खताळ
बीड
 
Top