उस्मानाबाद -: मराठवाडयातील समन्यायी पाणी वाटप आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसिंचनाचे प्रश्न व सदयस्थिती या विषयावर मंगळवार दि. 24 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद येथे मराठवाडयातील जलतज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत जलतज्ज्ञ एच.एम. देसरडा, प्रदीप पुरंदरे, अण्णा खंदारे, सुभाष लोमटे, उध्दव भवलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बैठकीत उस्मानाबाद आणि बीड जिल्हयासाठी महत्त्वपूर्ण असणा-या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मराठवाडयाच्या समन्यायी पाणी वाटपाच्या लढयात या मुद्दयाच्या प्रकर्षाने समावेश करण्यात यावा, यासाठी ठोस भुमिका घेतली जाणार आहे. बैठकीस पाणी प्रश्नाविषयी जागरुक असलेल्या नागरीक व सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक संयोजक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत अडसूळ, दिलीप पाठक-नारीकर, सुनील बडुरकर यांनी केले आहे.