मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सरकारने काढलेल्या जादूटोणाविरोधी वटहुकुमाने नरबळीसह विविध प्रकारच्या एकूण १२ अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथांना प्रतिबंध करण्यात आला असून, यापैकी कोणत्याही प्रथेचे केवळ आचरण करणेच नव्हे तर त्याचा प्रयत्न व प्रसार करणेही शिक्षापात्र गुन्हा ठरविला आहे.
वटहुकुमाच्या अनुसूचीमध्ये प्रतिबंधित प्रथा व कृत्यांची सविस्तर जंत्री देण्यात आली असून, अशा प्रथा आणि जादूटोण्याची जाहिरात, आचरण, प्रसार किंवा प्रचालन करणे गुन्हा ठरवण्यात आला असून, दोष सिद्ध झाल्यावर अपराध्याला किमान सहा महिने ते सात वर्षांपर्यंतचा कारावास आणि पाच हजार ते ५0 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही त्यात करण्यात आली आहे.
एवढेच नव्हे, तर शिक्षापात्र अशा कोणत्याही कृतीस किंवा अपराधास अपप्रेरणा देणे वा तसा प्रयत्न करणे, हाही गुन्हा मानण्यात आला असून त्यासाठीही मूळ गुन्ह्याएवढीच शिक्षेची तरतूद केली आहे. या कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी पोलीस ठाण्यांमध्ये खास 'दक्षता अधिकारी' नेमण्याची तरतूदही करण्यात आली. कायद्याने निषिद्ध ठरवलेल्या प्रथा व कृतींना प्रतिबंध करणे, त्यांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध तक्रार दाखल करणे, इतर कोणी तक्रार दाखल केल्यास त्यावर जलद कारवाई होईल याची खातरजमा करणे, त्यासाठी पोलीस ठाण्यास आवश्यक मार्गदर्शन व मदत करणे व खटला परिणामकारकपणे चालवण्यासाठी पुरावा गोळा करणे इत्यादी कर्तव्ये अशा दक्षता अधिकार्यास नेमून दिली आहेत.
या दक्षता अधिकार्यास आपली कर्तव्ये निर्वेधपणे व कोणत्याही दडपणाविना पार पाडता यावीत, यासाठी त्याच्या कर्तव्यात अडथळे आणणार्यास तीन महिन्यांपर्यंतची कैद व पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूदही वटहुकुमात करण्यात आली आहे.
प्रतिबंध केलेल्या अमानुष व अघोरी प्रथा या वटहुकुमाने ठरवलेले सर्व गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र असून, त्यासंबंधीचे खटले महानगर दंडाधिकारी अथवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात चालतील. अशा खटल्यांची वृत्ते प्रसिद्ध करण्यास प्रसिद्धीमाध्यमांना मज्जाव असेल व खटला पूर्ण झाल्यावर संबंधित न्यायालय दोषी ठरलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व त्यास कोणत्या गुन्ह्यासाठी किती शिक्षा दिली गेली, यासह आवश्यक तपशील पोलिसांमार्फत स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करेल.