सोलापूर : राज्य परिवहन महामंडळातर्फे पुरविण्यात येणा-या सर्व सुविधा आणि राबविण्यात येणा-या योजनांची माहिती, एसटीचे वेळापत्रक, त्यात होणारे वेळोवेळी बदल, तिकीट दरात केलेली वाढ व घट याची माहिती त्वरीत प्रवाशांना मिळावी, यासाठी आता राज्य महामार्ग परिवतन महामार्ग (एसटी) आता सोशल नेटवर्कचा उपयोग करुन फेसबुकवरुन जनतेशी संपर्क साधणार आहे.
    फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर रा.प. महामंडळाचे www.facebook.com/msrtc.in हे पेज नोंदविण्यात आले असून या पेजद्वारे प्रवाशी जनतेस रा.प. महामंडळाशी त्वरित संपर्क साधता येत आहे.
    रा.प. महामंडळातर्फे पुरविण्यात येणा-या सुविधा आणि राबविण्यात येणा-या योजनांची माहिती वर्तमानपत्रात, आकाशवाणी, दुरदर्शन, संकेतस्थळ तसेच इतर इलेक्ट्रानिक प्रसिध्दी माध्यमांमार्फत प्रवाशी जनतेपर्यंत वेळोवेळी पोहचविण्यात येते. या पेजवर प्रवाशांना आवश्यक असलेली सर्व अदययावत माहिती पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून प्रवाशांनी या पृष्ठावर नोंदविलेल्या सूचनांची त्वरित दखल घेतली जाणार आहे. रा.प. महामंडळाच्या या नवीन सुविधेमुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले तंत्रज्ञान, व्यावसायिक आणि तरुण वर्ग मोठया संख्येनी एसटीकडे आकर्षित होणार असल्याने एसटीच्या उत्पन्नवाढीत होणार आहे.
    प्रवाशांनी फेसबुकवरील www.facebook.com/msrtc.in या अधिकृत पेजवर रा.प. मंडळाशी संवाद साधावा, असे आवाहन रा.प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी केले आहे. भविष्यात एसटीतर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी कटिबध्द असल्याचेही कपूर यांनी सांगितले.
    सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसुबक सध्या भारतात मोठयाप्रमाणावर वापरण्यात येत आहे. यावर्षी 30 एप्रिलअखेर भारतात फेसबुक वापरणा-यांची संख्या पाच टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच भारतात 8.2 कोटी लोकांचे फेसबुकवर खाते असल्याचे सांगण्यात आले आहे. जानेवारी ते मार्चअखेर याची संख्या 7.5 कोटी होती. यानंतर मागील महिन्यात याची संख्या 1.15 अरब झाली होती, असे रा.प. महामंडळाच्या अधिका-यांनी सांगितले. म्हणूनच एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी या सोशल नेटवर्किंग साईटचा आधार घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
Top