नळदुर्ग -: येथे एटीएमची सुविधा नसल्याने शहर व परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्याकरीता स्टेट बँक हैद्राबाद नळदुर्ग शाखेमध्ये एटीएमची सुविधा तात्काळ सुरु करण्याची मागणी ऑल इंडिया मजलिस इत्तेदाहुल मुसलमीनचे नळदुर्ग शहराध्यक्ष अ.रज्जाक अ.रहेमान कुरेशी यांनी बँकेच्या मॅनेजरकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 
Top