नळदुर्ग -: शहराचा सर्वांगिण विकास करुन सर्वसामान्यांना न्याय देणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असून निस्वार्थपणे काम करणा-या कार्यकर्त्यांची एक फळी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथे आयोजित जाहीर सभेत केले.
    नळदुर्ग नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक संजय बताले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी मंत्री तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केले. भवानी चौकात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. दिपक आलुरे, शिवदास कांबळे, सिद्रामप्पा खराडे, वसंत वडगावे, आदित्य बोरगांवकर आदीजण उपस्थित होते. याप्रसंगी आ. पाटील बोलताना पुढे म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांचे कसलेही काम हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे गेल्यावर झालेच पाहिजे असा विश्वास निर्माण करा. या परिसरात उदयोग धंदयाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संजय बताले यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद या परिसरात वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.
    याप्रसंगी नगरसेवक संजय बताले यांनी बोलताना सांगितले की, कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडे पाहिले जाते. ज्या लोकांनी मला निवडून दिले, त्यांचा विचार घेऊनच मी या पक्षात प्रवेश केला आहे. लोकांच्या विश्वासास पात्र राहून त्यांच्या भावनेला तडा जाऊ न देता मी पुढील कारकीर्द सांभाळणार आहे. प्रत्येक व्यक्ती पक्षाला जोडला जावा, पक्ष मजबूत व्हावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार आहे.
    यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, शिवाजीराव मोरे, माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, ॲड. दिपक आलुरे, राजू पोतदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक नय्यर जहागिरदार यांनी केले तर आभार नगरसेवक सचिन डुकरे यांनी मानले. या कार्यक्रमास नगरसेविका महेबूब शेख, जुल्फेखार सय्यद, सौ. निर्मला गायकवाड, सौ. सुमन जाधव, नगरसेवक दयानंद बनसोडे, पिंटू मोरे, अमित पाटील, समीर मोरे, संभाजी कांबळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.
* एखादया नगरसेवकाने शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केल्याची ही पहिलीच घटना असावी, अशी सर्वसामान्यात चर्चा दिवसभर होती.
* राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे व बॅन्जो, हलग्याच्या आवाजाने भवानी चौक ते चावडी चौक येथील वातावरण राष्ट्रवादीमय झाले होते.
* संजय बताले यांच्या शहरातील व परिसरातील कार्यकर्त्यांनी बताले यांना खांदयावर घेऊन वाजतगाजत व फटाक्यांची आतिषबाजी करीत राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर सोडले.
 
Top