सोलापूर -: समर्पित सेवा करण्याचा ध्यास ठेवल्यास नक्कीच समाजोपयोगी कार्य घडतात असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी केले.
अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्र, कुंभारी व जिल्हा अंधत्व निवारण समिती यांच्या सहकार्याने आयोजित मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महापौर अलका राठोड, उपमहापौर हारुन सय्यद, माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिनी पारेख, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्यासह विपीन पटेल उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पुरके म्हणाले की, पद्मश्री डॉ. लहाने यांच्या सारखी वैद्यकीय सेवा देणारी व्यक्ती समाजात असल्यामुळे अनेक गोरगरिबांना दृष्टी मिळाली आहे. जगामध्ये लौकिकार्थाने महत्वाच्या व्यक्तींच्या श्रेणी ठरलेल्या आहेत. परंतु डॉ. लहाने हे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे असले तरी कर्तृत्वाने ते प्रथम श्रेणीत मोडतात. कारण अनेक संकटांना तोंड देत त्यांनी लाखो नेत्र शस्त्रक्रिया मोफत करुन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना डोळे नाहीत त्यांना डोळ्याचे महत्व कळते. अशा अंधांना दृष्टी देऊन त्यांनी समाजोपयोगी कार्य केले आहे असे गौरोवोदगार काढले. त्यांचाच वसा डॉ. पारेख समर्थपणे चालवित आहेत असेही ते म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याला सुशीलकुमार शिंदें सारखे विकासाची दुरदृष्टी असणारे नेतृत्व लाभल्यामुळे सोलापूरचा विकास झपाट्याने झाल्याचे दिसते. ज्यांना विकासाची दृष्टी असते तेच खरे विकासचे प्रणेते असतात असा उल्लेख त्यांनी केला.
डॉ. लहाने यावेळी म्हणाले की, गोरगरिब अंधांना दृष्टी देण्याचे चांगले कार्य माझ्या हातुन घडत राहो. यामध्ये माझ्या सर्व सहका-यांचा मोलाचा वाटा आहे. सोलापूरातील शिबीरामध्ये 508 रुग्णांवर मोतीबिंदु शस्त्रक्रिया केल्याच त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
डॉ. पारेख यांनी भाषणातुन आलेल्या विविध अनुभवाचे कथन केले.
कार्यकमात सर्वश्री म्हेत्रे, पाटील, पटेल यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स डॉ. दिनकर रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भडकुंबे, डॉ. माधवी रायते यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.