उस्मानाबाद : मराठवाडा मुक्‍ती संग्रामदिनानिमित्‍त दि. 17 सप्‍टेंबर रोजी उस्‍मानाबाद जिल्‍हयात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाने उत्‍स्‍फुर्तपणे मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिन साजरा करण्‍यात आला.
राज्‍य परिवहन महामंडळ, उस्‍मानाबाद
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रा. प. विभागीय कार्यालयात रा. प. महामंडळाचे अध्यक्ष जिवनराव गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागातील तिन अपंग कर्मचारी बामणकर, जाधव, मनिषा पवार यांना स्कुटी वुईथ अ‍ॅडप्शन या अपंग उपकरण वाहनाचे अध्यक्षांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास विभाग नियंत्रक प्रदिप खोबरे, वाहतुक अधिकारी हाश्मी, गायकवाड, दिलीप मराठे, नेहरकर, बिराजदार, पवार आदि कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवन, उस्मानाबाद
राष्ट्रवादी भवन उस्मानाबाद येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अमोल पाटोदेकर, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, अ‍ॅड. सत्यनारायण दंडनाईक, बाळासाहेब पाटील, शिवदास कांबळे, रामचंद्र पाटील, भा. न. शेळके, सौ. नंदा पनगुडे, कैलास पाटील, संजय देशमुख, नगराध्यक्षा रेविता बनसोडे, उपनगराध्यक्ष अमित शिंदे, मिनाक्षी माळी, सिंधुताई पेठे, गफार काझी, पं. स. सभापती सौ. प्रेमलता लोखंडे, उपसभापती दत्ता देवळकर, सौ. सुशिला कठारे, नागनाथ पवार, संजय पाटील, कृउबाचे सभापती राजेंद्र पाटील, पोपट पाटील, माणिक बनसाडे, प्रल्हाद धत्तुरे, संजय पाटील भंडारीकर, सुरेश भोसले, महादेव माळी, अंकुश जगताप, राम तेरकर, मुकूंद सुर्यवंशी, किरण नायकल, दत्ता पेठे, अमोल पाटील, डॉ. समदळे आदिंची उपस्थिती होती.
जिल्‍हा पोलीस अधिक्षक कार्यालय, उस्‍मानाबाद
मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या 65 वा वर्धापन दिनानिमित्‍त जिल्‍हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. यावेळी अपर पोलीस अधिक्षक बाळकृष्‍ण भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर पोलीस निरीक्षक एम.डी. गुंडीले, ए.एम. अंदुरकर, एस.एस. भुमकर, संतोष गायकवाड यांच्‍यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भोसले हायस्कूल, उस्मानाबाद
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीपतराव भोसले माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा करण्यात आला. यावेळी मा. स्वातंत्र्य सैनिक प्रभाकर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एस. एल. पडवळ, बी. जी. जाधव, स्वा. सै. बुबासाहेब जाधव, एस. बी. कोळी, डॉ. व्ही. बी. पडवळ, नानासाहेब हाजगुडे, के. के. जाधव, मुकेश देशमुख, एस. एस. देशमुख, घार्गे एस. के., चंदनशिव ए. बी., जंगम एस. एस., गायकवाड डी. आर. आदिंची उपस्थिती होती.
नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्‍तीसंग्रामदिन साजरा
नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्‍तीसंग्रामदिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. यावेळी शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच विविध शिक्षण संस्‍थेमध्‍ये राष्‍ट्रीय ध्‍वज फडकविण्‍यात आला. यावेळी मुख्‍य ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम येथील ऐतिहासिक किल्‍ल्‍यावर पार पडला. नळदुर्ग शहरातील कला, विज्ञान व वाणिज्‍य महाविदयालय, अध्‍यापक विदयालय, अध्‍यापक विदयालय, जि.प. प्रशाला, जि.प. कन्‍या प्रशाला, केंद्रीय प्राथमिक शाळा आदी ठिकाणी ध्‍वजारोहण करण्‍यात आला. तसेच नगरपरिषदेत नगराध्‍यक्ष शब्‍बीरअली सावकार यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. यावेळी उपनगराध्‍यक्षा सौ. अपर्णा बेडगे, न.प. तील राष्‍ट्रवादीचे गटनेते नय्यर जहागिरदार, नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, नितीन कासार, अमृत पुदाले, दयानंद बनसोडे, नगरसेविका सुप्रिया पुराणिक, कुशावर्ती शिरगुरे, मुख्‍याधिकारी त्रिंबक ठेंगळे-पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रभाकर सुरवसे यांच्‍यासह न.प. कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. त्‍याचबरोबर नळदुर्ग पोलीस ठाण्‍यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांच्‍यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. हुतात्‍मा स्‍मारक, चावडी चौक या ठिकाणीही ध्‍वजारोहण करण्‍यात आला.
जि. प. प्रशाला, बु-हाणपूर
भूम तालुक्यातील बु-हाणपूर येथील जि. प. प्रा. शाळेमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुनिल घाडगे, राजाभाऊ करडे, वर्षा पिंगळे, संजय धुमाळ, श्रीनिवास गलांडे पालक उपस्थित होते.
सवित्रीबाई फुले विद्यालय, कळंब
कळंब येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती मनोरमाताई भवर, काकासाहेब मुंडे, श्रीमती प्रतिभा गांगर्डे, जिवनसिंह ठाकूर, श्रीमती अलका देवरे, ज्ञानेश्वर तोडकर आदि उपस्थित होते.
ग्रा. पं. आरळी (बु)
तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील जि. प. प्रशालेत व ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच चंद्रहार नारायणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य काशिनाथ बंडगर, माजी पं. स. सदस्य रंगनाथ पारवे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनिल पारवे, युवराज पाटील, ग्रामसेवक सदानंद इंगळे, बाबासाहेब भोसले, सौदागर गिड्डे, भिमराव सोनवणे, तानाजी पारवे, राम पारवे, दादाराव पारवे, प्रभाकर उळेकर, शरद पारवे, खोपडे, जयपाल जांभळे, राम शितळकर, मुख्याध्यापक मोकाशे, पुरी, माने आदिंची उपस्थिती होती.
शरद पवार हायस्कूल, उस्मानाबाद
येथील शरद पवार माध्य. व उच्च मा. विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य खंडागळे बी. जी., मल्हारी ओमासे, चंपतराय अजमेरा, प्रकाश देशमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा, पारगाव
गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती वाशी यांच्यातर्फे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्राथमिक शाळेतील दिक्षा ढेपे चित्रकलेमध्ये प्रथम, दिक्षा निंगुळे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, सुमित कावळे धावणे स्पर्धेत तृतीय यांनी १ ली ते ४ थी गटामध्ये यश मिळविले. श्रावणी मोटे रांगोळी स्पर्धेत द्वितीय, सुरवसे बाळासाहेब गायन स्पर्धेत द्वितीय यांनी ५ वी ते ७ वी गटामध्ये यश मिळविले. यशस्वी विद्याथ्र्यांना सर्वशिक्षक व मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशबद्दल शालेय समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी यशस्वी विद्याथ्र्यांने अभिनंदन केले आहे.
विद्यामाता हायस्कूल, उस्मानाबाद
विद्यामाता हायस्कूलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त फा. घोन्सालो डिसिल्वा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य फा. व्हिक्टर बांड्या, मुख्याध्यापक फा. निलेश वाझ, फा. सौजन्य अल्मेडा, फा. सेबेस्टीन गोम्स, ब्रदर डॉमनिक सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
जि. प. शाळा तेरखेडा
तेरखेडा येथील केंद्रीय जि. प. शाळा व जि. प. कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी बिभीषण खामकर, मुख्याध्यापक कोरे डी. एस., मुख्याध्यापिका गवारे एन. जे., अच्चुत शिंदे, बाबुराव घुले, उद्धव घोलप, उद्धव साळवे, शिक्षकवृंद उपस्थित होते.
मस्सा (खं) येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन साजरा
कळंब तालुक्यातील मस्सा खं. येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला. ग्रा. पं. कार्यालयात नेमिनाथ इंगोले यांच्या हस्ते म. गांधीजी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच मिनाक्षी ओव्हाळ, उपसरपंच बजरंग ताटे उपस्थित होते. विकास कार्यकारी से. सो. येथे डि. सी. सी. बँकेचे शाखा प्रमुख वाघमारे यांच्या हस्ते मा. गांधीजींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते. युनानी दवाखाना येथे युनानीचे डॉ. नसिर अहमद देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जि. प. प्रशालेत सहशिक्षक लिमकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक परिट, सय्यद, टोणगे उपस्थित होते.
ईट ग्रा. पं. च्या वतीने स्वा. सैनिकांचा सत्कार
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन ईट ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच सुलभाताई चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी किसनराव सोनार, बाबुराव लोखंडे, कलावती लोखंडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी काकासाहेब चव्हाण, सुरेंद्र बोंदांर्डे, दत्ता अहिरे, बापू हाडुळे, श्रीमंत डोके, वल्ली महंमद काजी, केशव चव्हाण आदि उपस्थित होते.
 
Top