कळंब : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासुन कळंब शहरात प्लॅस्टिकबॅगवर न. प. ने बंदी घातली असुन शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. न. प. च्या सर्वसाधारण सभेमध्ये प्लॅस्टिक बंदीचा ठराव संमत करण्यात आला.
शहरातील सर्वच लहान मोठ्या दुकानामध्ये सर्रास कॅरीबॅगचा वापर केला जातो. कॅरीबॅगला पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करणे बंधनकारक असताना व्यापारी या पिशव्या महागात बसत असल्याने वापरत नाहीत. येत्या गांधी जयंतीपासुन या ठरावाची अंमलबजावणी होणार आहे.
शहर प्लॅस्टिकमुक्त होण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी न. प. ला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उपाध्यक्ष पांडूरंग कुंभार यांनी केले आहे. शहरातील बचत गटाने कापडी पिशव्यांची निर्मिती केल्यास या पिशव्यांना बाजार पेठ मिळवून देण्यासाठी न. प. प्रयत्न करणार आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असुन व्यापा-यांनी याचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा न. प. प्रशासनाने दिला आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्वात जास्त वापर भाजी, फळ विक्रेते, औषधांचे व्यापारी करु लागले आहेत. शहरातील कच-यामध्ये सर्वात जास्त कचरा हा प्लॅस्टिक पिशव्यांचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
कळंब शहरामध्ये पन्नास मेडीकल दुकान, पन्नास-साठ फळांचे स्टॉल तर दररोज शंभर ते दोनशे भाजी विक्रेते या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करतात. किराणा दुकान, कापड दुकान, मटन मच्छीची दुकाने, स्टेशनरी दुकाने यामध्ये ग्राहक पिशव्या घेऊन येत नसल्याने पिशव्या घ्याव्या लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
प्लॅस्टिक मुक्त शहर करण्यासाठी कापडी पिशव्या हा एकमेव पर्याय आहे. यासाठी प्रत्येक घरातुन साडी, कपडा दिल्यास महिला बचत गटाने याच्या पिशव्या तयार करुन अल्प किंमतीमध्ये विकाव्यात असा पर्याय एकता बचत गटाने सांगितला आहे. शहराला दररोज कमीत कमी एक हजार पिशव्यांची गरज आहे. ग्राहकांकडे पिशवी नसल्यास व्यापा-यांनी पिशव्यांचेही पैसे लावावेत व ती पिशवी वापस आणून दिल्यास त्या ग्राहकाचे पैसे परत करावेत असा पर्यायही यामधुन निघावा अशी चर्चा होऊ लागली आहे.
शहरातुन प्लॅस्टिक घालवायचे असले तर व्यापारी, ग्राहक यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. न. प. प्रशासनाने या ठरावाची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असुन व्यापा-यांना पेपर, कापडी बॅग पुरवण्यासाठी एखाद्या संस्थेबरोबर करारही करणे तेवढेच महत्वाचे आहे. सध्या सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीचा प्रश्न चर्चीला जात आहे. याला पुर्णपणे आळा बसण्यासाठी प्रत्येकानेच याची काळजी घेणे गरजेचे आहे.