नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून सर्वसमान्यांना रडवणाऱ्या कांद्याचे दर १५ दिवसात कमी होणार आहेत. खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
नवीन कांदा बाजारात आल्यानं कांद्याचे दर कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र यामुळे शेतक-यांना मिळणाऱ्या दरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
किरकोळ बाजारात कांद्याचा भाव जवळपास ७० रुपयांवर पोहोचला आहे. कांद्याचा सरासरी दर प्रति क्विंटल साडे पाच हजारांवर गेला आहे.
यामुळे सर्वसामान्य जनता हैरान झाली आहे. यावर आता शरद पवारांनी दिलासा दिला आहे.
यावेळी पवार म्हणाले. “ मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे १५ दिवसांत कांद्याचे दर उतरण्यास सुरूवात झाली. नाशिक आणि परराज्यातील कांदा बाजारात येऊ लागला आहे. याशिवाय परदेशातील कांदाही बाजारात आला आहे. यामुळे पुढील १५ दिवसांत कांद्याचे दर उतरण्याची मला खात्री आहे. यामुळे शेतक-यांची नाराजी मात्र मला सोसावी लागणार आहे”.