उस्मानाबाद - तीन ते सहा वयोगटातील बालकांच्या सर्वींगीण विकासासाठी लोकसहभागातून आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करुन औरंगाबाद जिल्ह्यात ज्याप्रमाणे काही अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळाले त्याच धर्तीवर येथे प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्तींनी निर्धार केला आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
       येथील बालविकास अधिकारी श्री. यादव श्री. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिल्ह्यातील अंगणवाडी कार्यकर्तींनी औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ, पाटोदा, सातारा, अब्दीमंडी येथील आयएसओ अंगणवाडीस भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. लोकसहभागातून बालकांचा सर्वांगीण विकास, , अंगणवाडीमध्ये विविध प्रकारची खेळणी, रंगरंगोटी, फर्निचर, अंगणवाडीसाठी संरक्षक भिंत व त्याअंतर्गत परसबाग अत्यंत आकर्षकपणे मांडणी करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही अशाच पद्धतीने सहभाग राहिला आहे. मात्र ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.                               
 
Top