कळंब -: कळंब-येरमाळा रोडवर पर्याय संस्‍थेजवळ भरधाव टाटासुमो जीप व मोटारसायकल यांच्‍या भीषण अपघातात सातजण गंभीर जखमी झाल्‍याची घटना मंगळवार रोजी दुपारी घडली आहे. अपघातातील जखमीवर कळंब ग्रामीण रूगणालयात उपचार करून तिघाची प्रकृती चिंताजनक असल्‍याने त्‍यांना बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.
ईटकुर ता. कळंब येथील वैभव राजकुमार पोते वय 21, गणेश विश्‍वनाथ गंभिरे वय 19 हे वाठवडा ता. कळंब येथिल त्‍यांचे नातेवाईक बबन शांतीनाथ कासार यांना घेवुन कळंब येरमळा रस्‍त्‍याने ईटकूरकडे दुचाकी क्र.एम.एच 25 एस 331 यावर स्‍वार होवुन जात असताना येरमळयाहुन भरधाव टाटासुमो जीप क्र. एम.एच.बी 751 ही पर्याय संस्‍थेजवळ आली असताना समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्‍ये मोटारसायकलवरील वैभव पोते, गणेश गंभीरे, बबन कासार हे गंभीर जखमी झाले. तर जीपमधील सरकारी दवाखान्‍याचे कर्मचारी डॉ. भक्‍ती सुभाष गिते वय 31, दत्तप्रसाद हेड्डा वय 30, प्रमिला सोकाडे, जीपचालक इब्राहीम मिर्झा हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात स्‍थळी मोटार सायकलचा चुरा झाला होता. तर जीप रस्‍त्‍याच्‍या कडेला नीलगिरीच्‍या झाडावर जाऊन आदळली होती. या अपघातात मोटारसायकलवरील तिघांच्‍याही पायांना गंभीर इजा झाले असून घटनास्‍थळी पायाचे हाड तुटुन पडल्‍याने दिसून आले. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्‍हा दाखल झाला नव्‍हता.
 
Top