नळदुर्ग -: येथील ऐतिहासिक किल्ल्यातील नरमादी धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या गर्दीने रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहर अक्षरशः फुलुन गेले होते. रविवार हा दिवशी शासकीय सुट्टी असल्याने अनेकांनी सहकुटुंब, सहपरिवार नळदुर्गला देवून किल्ल्यातील धबधबा पाहण्याचा विलोभनीय आनंद घेतला. त्याचबरोबर मैलारपूर (नळदुर्ग) खंडोबा मंदिर, रामतीर्थ येथेही मोठयाप्रमाणावर पर्यटकांनी भेट दिली. तसेच रविवार हा नळदुर्गचा आठवडी असल्याने परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर पर्यटकांना वाहन लावण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागत होता. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडली होती.
शुक्रवार रोजी नर-मादी हा धबधबा कोसळण्यास सुरुवात झाल्याने त्याचे छायाचित्रासह सविस्तर वृत्त वृत्तपत्रातून शनिवार रोजी प्रसिध्द झाले होते. रविवार रोजी सकाळपासूनच एस.टी. बसने, दुचाकी, चार चाकी यासह आपआपल्या वाहनातून नळदुर्गमध्ये बाहेरगावाहून पर्यटक येण्यास सुरुवात झाली. दिवसभर एक सारखी पर्यटकांची रिघ लागली होती. त्यामुळे शहरातून रस्त्याचा माग काढताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत होती. राष्ट्रीय महामार्ग ते कुरेशी गल्ली ते किल्ल्यापर्यंत जाणा-या अरुंद रस्त्यावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होऊन पर्यटकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. तर काहींना वाहन लावण्यासाठी जागाच मिळाली नाही. याच रस्त्यावर आठवडी बाजार असल्याने भाजीपाला विक्रेते असल्याने त्याचाही त्रास रहदारीला झाला. नगरपालिका प्रशासनाने किमान यापुढे तरी येथील आठवडी बाजार हुतात्मा चौकात भरवून पर्यटकांसाठी रस्ता मोकळा करुन त्यांना दिलासा देण्याची मागणी पर्यटक व इतिहासप्रेमी नागरिकांतून केली जात आहे.