मुंबई : सैन्य व पोलीस दलामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) द्वारे, मेस्को करीअर अँकॅडमी, करंजे नाका, सातारा येथे 28 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
30 दिवसासाठीच्या या प्रशिक्षण शिबिरासाठी निवास व भोजनासह एकूण प्रशिक्षण शुल्क 6 हजार रुपये आहे. प्रशिक्षणार्थींच्या अधिक सरावासाठी 60 दिवस आणि 90 दिवसांच्या प्रशिक्षणाची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण शुल्क एक रकमी भरणाऱ्यास प्रशिक्षण शुल्कात योग्य सूट देण्यात येणार आहे.
समाजाच्या सर्व स्तरातील सर्व युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण उपलब्ध आहे. आगामी पोलीस दल भरती आणि सध्या महाराष्ट्रातील नियोजित सैन्य दल भरती यासाठी हे शिबीर महत्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवारांनी त्याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मोबाईल क्रमांक 7588624043 किंवा 9420697807 वर संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) च्या http://mescoltd.co.in/pages/mcaSataraAbout.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी, असे शहर सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.