उस्मानाबाद -: वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना कार्यक्षमरित्या व प्रभावीपणे राबविण्यासाठी व प्रस्तावास मंजूरी देण्याकरीता जिल्हास्तरीय समितीची पुनर्रचना करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या समितीवर अशासकीय अध्यक्ष व सदस्याच्या नियुक्तीसाठी इच्छूक असलेल्या व अटी आणि पात्रता धारण करत असलेल्या जिल्ह्यातील लमाण/बंजारा किंवा भटक्या जमातीच्या व्यक्तीने आपले परिपूर्ण प्रस्ताव दि. 7 ऑक्टोंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद या कार्यालयास सादर करावेत , असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण , उस्मानाबाद यांनी केले आहे.
या समितीत लमाण/बंजारा किंवा भटक्या जमातीपैकी अध्यक्ष पदासाठी-एक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद-सदस्य, कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग सदस्य (जिल्हा मुख्यालय),लमाण/बंजारा किंवा भटक्या जमातीपैकी एक सदस्य ( ज्या घटकांचा अध्यक्ष नसेल त्या घटकांचा) व सहायक आयुक्त समाज कल्याण सदस्य सचिव अशी रचना राहणार आहे. तरी संबंधितांनी विहित वेळेत तसेच विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन अर्ज सादर करावेत. अशासकीय अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी व शर्तीची माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद (दुरध्वनी क्रमांक 02472-222014/222313) येथे पहावयास मिळू शकतील.