बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाच्या अंतर्गत असलेल्या सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मुकुंद साळुंके व सचिव सचिन झाडबुके यांनी दिली.
    ऑक्टोबरच्या दुस-या आठवडयामध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप असून या पुरस्काराकरिता निवड करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे.
    आपल्या दैनंदिन विदयादानाच्या कार्यात मनापासून तळमळीने काम करणा-या शिक्षकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी संघटनेने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वी देण्यात येणा-या पुरस्काराचा काही कारणास्तव खंड पडल्यामुळे मधल्या काळात निर्माण झालेली पोकळी व उणीव भरुन काढण्याचे काम या निमित्ताने करण्यात येत असल्याचे पदाधिका-यांनी यावेळी सांगितले. चांगल्या काम करणा-या शिक्षकांनी आपल्या कार्याची माहिती व प्रस्ताव संघटनेचे सचिव सचिन झाडबुके, गोविंद दाळ मिलजवळ, सुभाष नगर बार्शी या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी 9404995654, 9527319292 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन नागनाथ राऊत व निलकंठ लिंगे यांनी केले आहे.
 
Top