बार्शी -: येथील वैदूवाडी भागातील दत्त प्राथमिक विदयामंदीर येथे शालेय विदयार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले.
    हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष टी.एस. पाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वामी समर्थ चॅरीटेबल ट्रस्ट व अतुल पाडे मित्रपरिवाराच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    नगरसेवक रमेश पाटील यांच्या हस्ते विदयार्थ्यांना वहयांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर न.पा. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती ज्योतिर्लिंग कसबे, नगरसेविका मंगलताई शेळवणे, अतुल पाडे, मुख्याध्यापक सादिक बागवान, स्वामी समर्थ चॅरीटेबल ट्रस्टचे पदाधिकारी आदीजण उपस्थित होते. आभार लंगोटे यांनी मानले.
 
Top