नळदूर्ग -: शेतातून गावाकडे परतणार्‍या शेतातील सालगड्यास भरधाव कंटेनरने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणूदर (ता. तुळजापूर) शिवारात घडली.
    राजेंद्र दत्ता सुर्यंवशी (वय 35, रा. अणदूर, ता. तुळजापूर) असे अपघात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अणदूर येथील राजेंद्र  सूर्यवंशी ) हे शाहूराज कांबळे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ते शेतातून पायी चालत अणदूर गावाकडे जात होते. यावेळी हैदराबाद येथून सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या कंटेनर (एमएच-43-यू-3414) ने सूर्यवंशी यांना जोराची धडक दिली व न थांबता पसार झाला. यामध्ये सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरचा पाठलाग करून चालकाला अटक केली. याप्रकरणी शाहूराज कांबळे यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालक चंद्रकांत नंदीकर (रा. पुणे) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
Top