बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध ११ विषयांचे वाचन करण्यात आले. दोन तीन विषयांवरील वाद सोडले तर उरलेले सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
    बार्शी नगरपरिषदेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके स्‍मारक सभागृहात ही साधारण सभा पार पडली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष कादर तांबोळी यांनी काम पाहिले. यात मुख्यत: न.पा.अध्यक्षांकरिता वाहनाची आवश्यकता असल्याने टाटा सफारी खरेदी करणे, केंद्र शासनाच्या युआयडी एसएसएमटी योजने अंतर्गत शहराकरिता भुयारी गटर बांधण्याच्या ८३७९.६० लाखांच्या कामाच्या प्राक्कलनास केंद्र शासनाच्या अनिवार्य व वैकल्पिक सुधारणासह सभागृहाची मंजूरी घेणे, सार्वजनिक संडास, मुतारी स्वच्छता व दुरुस्ती करणेकामी निविदा मागविणे, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त, सेवेत मयत झालेल्या सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना कामगार पदी लाड कमिटी शिफाररसीनुसार नियुक्त्या देणे, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळास न.प.ची भाडेतत्वार देण्यात आलेली जागेचे अधिमूल्य (भाडे) निश्‍चिती करुन घेणेकामी सविस्तर अहवाल करुन त्रिसदस्यीय समितीसमोर सादर करणे आदि विषयांना मंजूरी देण्यात आली.
 
Top