नळदुर्ग-  शिवसेनेच्‍यावतीने नळदुर्ग शहराच्‍या उत्‍तरदिशेला असलेल्‍या कुरनूर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पातील  पाण्‍याचे 'जलपूजन'  करुन दरवर्षी बोरी धरण पाण्‍याने दुथडी  भरुन वाहुन नळदुर्गात येणा-या बहुसंख्‍य पर्यकटकांना धबधब्‍याच्‍या माध्‍यामातुन आपले विलोभनीय दर्शन देण्‍याचे व श्री क्षेत्र तुळजापूर येथे वर्षभर  येणा-या भाविक भक्‍ताची तृष्‍णा भागवावी असे  साकडे  शिवसैनिकांनी यावेळी घातले.
     यावर्षी बोरी धरण शंभर टक्‍के भरले असून शुक्रवार रोजी पासून   धरणाच्‍या  सांडव्‍याद्वारे पाण्‍याचा मोठा विसर्ग  सुरू आहे. गतवर्षी पर्जन्‍यमान म्‍हणावे तितके न झाल्‍याने उन्‍हाळयात धरण पुर्णपणे कोरडे पडले होते. त्‍यामूळे नळदुर्ग तुळजापूर या दोन शहरात पिण्‍याच्‍या पाण्‍याची मोठी समस्‍या निर्माण झाली होती. .मात्र  यावर्षी बोरी धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात चांगला पाउस झाल्‍याने धरण तुडूबं भरुन वाहू लागले . धरणात जास्‍त झालेले पाणी सांडव्‍यातुन बोरी नदीत जातो . हेच पणी पुढे नळदुर्गातील किल्‍लयात वैशिष्‍टयेरित्‍या वळविण्‍यात आले असुन ते पाणी ''नरमादी ''  धबधब्‍यातुन जोरदारपणे कोसळतोय.आगामी काळात यामुळे  पाणी समस्‍या दुर झाली आहे. या धरणातील नवीन पाण्‍याचे नळदुर्ग शहर शिवसेनेच्‍यावतीने जलपुजन करण्‍यात आले.यांप्रसंगी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण , तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर घोडके, नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले, शंकर चव्‍हाण , शाम कनकधर यासह शिवसैनिक उपस्थित होते.          
 
Top