विनोद बनसोडे
नळदुर्ग -: विदयुत प्रवाह सुरु असलेल्‍या तारेचा स्‍पर्श होऊन एका मुलाचा करुण अंत झाल्‍याची दुर्दैवी घटना नळदुर्ग शहरातील बौध्‍दनगर येथे शुक्रवार रोजी घडली.
       विनोद दयानंद बनसोडे (वय 16 वर्षे, रा. बौध्‍दनगर, नळदुर्ग) असे विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू झालेल्‍या मुलाचे नाव आहे. यातील बौद्धनगर येथील रहिवाशी असलेला विनोद बनसोडे हा शुक्रवार रोजी सकाळी आपल्‍या घरासमोर असताना त्‍याचा झाडाच्या फांदीला स्पर्श झाला. यावेळी झाडावरुन गेलेल्या वीजेच्‍या तारेमुळे फांदीत विद्युत प्रवाह उतरल्याने विनोद बनसोडे यास विजेचा तीव्र धक्का बसला. त्‍यास तात्‍काळ प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन विनोद बनसोडे याचा मृत्‍यू झाल्‍याचे जाहीर केले. या घटनेची वैद्यकीय अधिकारी डॉ. कोळ्ळे यांनी पोलिसात खबर दिल्‍यावरुन नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोहेकॉ. एम.बारगजे हे करीत आहेत.
 
Top