नळदुर्ग -: प्रा. आर.आर. सोनकांबळे यांना पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
नळदुर्गचे रहिवाशी असलेले प्रा.आर.आर. सोनकांबळे हे पुणे येथील एस.एन.डी.टी. महाविदयालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून पुणे येथील काव्यमित्र संस्थेच्यावतीने सन 2013 चा राज्यस्तरीय पुरस्कार राज्य आरोग्य विभागाचे माजी उपसंचालक डॉ.बी.पी.गायकवाड यांच्या हस्ते व माजी अप्पर सहकार आयुक्त बी.टी. बधान, लिज्जत उदयोग समुहाचे सुरेश कोते, मानवाधिकाराचे आर.ए. रोकडे व सामाजिक कार्यकर्ते संतोष खांडके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यावेळी काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर, संजय जगताप, रघुनाथ ढोक, महेंद्र पाटोळे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा. सोनकांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार शिवाजी नाईक, एस.के. गायकवाड, भैरवनाथ कानडे, दयानंद काळुंके, सामाजिक कार्यर्ते मारुती बनसोडे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिंदन केले.