उस्मानाबाद :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जिल्हा  सामान्य  जिल्हा रुग्णालय, व टेलिमेडिसीन विभागाच्‍यावतीने वर्ल्ड हार्ट दिनानिमित्त दि. 24, 26 व 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 ते 6 यावेळेत जिल्हा रुग्णालय  व  उप जिल्हा रुग्णालय, उमरगा येथील टेलिमेडिसीन कक्षात Heart disease screeening camp शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हृदय रुग्णानी  या शिबीराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे यांनी केले आहे.
         या शिबीरात मुंबई येथील सुप्रसिध्द नानावटी रुग्णालयातील  विशेष तज्ञांकडून हृदय रुग्णास तज्ञ सल्ला व मार्गदर्शन व्हिडिओ  कॉन्फरन्सीव्दारे  माहिती दिली जाणार आहे. तरी हृदय रुग्णानी येताना यापूर्वी आरोग्याची तपासणी केलेले सर्व वैद्यकिय कागदपत्रे सोबत आणून आपली नाव नोंदणी वरील दिवशी दुपारी 12 ते 1 यावेळेत करावी व शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही  करण्यात आले आहे.
 
Top