उस्मानाबाद :- गर्भधारणापूर्व व प्रसुतीपुर्व लिंग निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना सामुचित प्राधिका-यानी जागरुक राहून सोनोग्राफी केंद्राची नियमित तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारुन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियांतर्गत आरसीएच 2 मधील पीसीपीएनडीटी कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व सामुचित प्राधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत डॉ. धाकतोडे बोलत होते.
लिंग निवडीने मुलींचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात मुलां-मुलींत असमतोल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा सर्वांनी सामाजिक व नैतीक जबाबदारी समजून कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. धाकतोडे प्रतिपादन केले. सोनोग्राफी केंद्राची माहिती देणाऱ्यांना 25 हजार रुपयाचे बक्षिस देण्यात येणार असून सामान्य नागरीक, आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी, शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनासूध्दा माहिती दिल्यास बक्षिसास पात्र राहतील. सोनोग्राफीसाठी 18002334475 या हेल्पलाईनवर देखील तक्रार नेांदविता येतील तसेच www.amchimulgi.in या संकेतस्थळावर देखील सोनोग्राफी केंद्रात कायद्याचा भंग होत असल्याची तक्रार नोंदवता येईल, असेही या कार्यशाळेत सांगण्यात आले.
पीसीपीएनडीटी नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय खुने यांनी प्रास्ताविकात लिंग निवडीमुळे समाजात मुलीचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगून मुला-मुलींमधील समतोलपणा वाढत असल्याचे सांगितले. विधी सल्लागार अँड. उमा गंगणे यांनी गर्भधारणापुर्व व प्रसुतीपूर्व लिंग निदान तंत्र, लिंग निवडीस प्रतिबंध, सोनोग्राफी आदि कायद्याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.
तुळजपूरचे नायब तहसीलदार आबासाहेब चौरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेत पीसीपीएनडीटी समितीचे सदस्य आरोग्य अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.