परंडा -: दुचाकी व टमटमची समोरासमोर धडक होऊन एका सातवर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाला तर तिचे वडील गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता इंद्रेश्वर साखर कारखान्याजवळ उपळाई फाट्यानजीक घडली.
संयोगिता ऊर्फ सिध्दी चव्हाण (वय 7 वर्षे, रा. परंडा) असे अपघात मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. तर अशोक चव्हाण (वय 35 रा. परंडा) असे जखमीचे नाव आहे. यातील अशोक चव्हाण व त्यांची मुलगी संयोगिता हे दुचाकी (एमएच 25- डब्ल्यू 6977) वरून बार्शीकडे जात होते. त्यावेळी बार्शीकडून टमटमने (एमएच 12 टी 4731) समोरून जोराची धडक दिली. यामध्ये सिद्धी व तिचे वडील गंभीर जखमी झाले. बार्शी येथे उपचारादरम्यान सिद्धीचा मृत्यू झाला.