बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पानगांव (ता. बार्शी) येथे महावितरणचे उपकेंद्र आहे. या गावातील वीज पुरवठयाची 98 टक्के वीज बील वसुली आहे. असे असतानाही साडे नऊ तासांचे भारनियमन केले जात आहे. सदरचे भारनियमन हे वीज गळतीच्या नावाखाली होत असून याचा नाहकच त्रास नियमित वीजबील भरणा-या ग्राहम व शालेय विदयार्थ्यांना होत असून यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
विदयार्थी व गावक-यांमध्ये यामुळे तीव्र नाराजी निर्माण झाल्यने मेणबत्ती मोर्चा व शालेय विदयार्थ्यांचा मेणबत्तीच्या मंद प्रकाशात अभ्यास करुन तीव्र निषेध करण्यात आला आहे. पानगांव उपकेंद्रातून नऊ गावांना वीजपुरवठा केला जात असून शेतीच्या वापरासाठी स्वतंत्र घरगुती वापरासाठी भगीरथ योजना सुरु आहे. वीजचोरी करणा-यांवर अंकुश अथवा कारवाई करणे हे वीज वितरण विभागाची जबाबदारी व कर्तव्य असताना नेमलेले कर्मचारी व अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने कसलीही कारवाई होत नाही. याचा फटका सर्वसामान्यांना होत असून वरिष्ठ अधिकारी बेजबाबदापणे काम करत असल्यचे दिसून येते. सदरच्या वारंवार होणा-या भारनियमनाविरुध्द विदयार्थ्यांनी केलेले हे आंदोलन महावितरणचे डोळे उघडणार की यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याची वेळ पानगांवकरांवर येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवडणुकीपुरते संपूर्ण महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याची घोषणा ऊर्जा खात्याला ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची कीव येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील पानगांवसारखी आणखी किती गावची पिळवणूक व जाणीवपूर्वक छळवणूक केली जात आहे, हे हळूहळू समोर येत आहे.