बार्शी -: येथील श्री शिवाजी महाविदयालयाचा मानसशास्त्र विभाग व विदयापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने “किशोरवयीन मुलांचा सर्वांगिण विकास” या विषयावर शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राजर्षी शाहू लॉ कॉलेज, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते याचे उदघाटन होत असून डॉ. बाबासाहेब आंबडेकर विदयापीठाचे मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच.वाय. नरके, पुणे विदयापीठाचे मानसशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ.पी.व्ही. रसाळ, प्रा.डॉ. एम.जी. जाधव (इस्लामपूर), प्रा.डॉ. के.एम. जाधव (बारामती) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या चर्चासत्रात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विदयालयाचे शिक्षक, प्राध्यापक, मानसतज्ञ, शिक्षण्रपेमी, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांनी केले आहे.