उस्मानाबाद :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्या मनात शिक्षणाबाबत जनजागृती करुन आपुलकी निर्माण करावी, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
येथील पुष्पक मंगल कार्यालयात जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बसवराज पाटील हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,अप्पासाहेब पाटील, संजय निंबाळकर, कळंब पंचायत समिती सभापती छाया वाघमारे, मधुकरराव तावडे, ब्रिजलाल मोदाणी, सुधीर पाटील, विश्वास शिंदे, लक्ष्मण सरडे, जि.प.सदस्य धीरज पाटील, गुंड,भालेराव, श्रीमती कटारे, अस्मिता कांबळे, प्रकाश आष्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.हरिदास, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वैजनाथ खांडके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर चौधरी आदिंची उपस्थिती होती.
पालकमंत्री चव्हाण यावेळी म्हणाले की, माझे जीवन हे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर गेले असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडविण्याचे काम शिक्षकांनी केले आहे. शिक्षकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देऊन शिक्षकांची मुले येथे शिकतात असा संदेश द्यावा. तसेच शासनाच्या शैक्षणिक योजनांची माहितीही ग्रामीण भागातील मुला-मुलींपर्यंत पोहचवावी,असे सांगून ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला त्यांचे मी मनापासून कौतूक करुन अभिनंदन करतो, असेही श्री.चव्हाण यावेळी सांगितले.
आमदार बसवराज पाटील म्हणाले की, शिक्षक हे सर्व सामान्य लोकापर्यंत शिक्षणाची जनजागृती करत आहेत. आपली परंपरा टिकवून प्रत्येक कुटूंबात शिक्षणाबाबत आवड निर्माण कशी करता येईल, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद करुन पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गोरे म्हणाले की, बुध्दीमता व कष्ट असणाऱ्या व्यक्तीलाच असे पुरस्कार प्राप्त होतात. शिक्षकांनी नवीन पिढी घडविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी करावे. त्याच बरोबर शैक्षणिक साक्षरतेबाबत जनजागृती करुन जिल्ह्याचा मानव निर्देशांक वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा,असे सांगून त्यांनी शिक्षणाची गळती थांबावावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जि.प.अध्यक्ष डॉ.व्हट्टे यांनी सांगितले की, गुणवंत पुरस्कार विजेते शिक्षकांचे अभिनंदन केले. विज्ञानाला आध्यामाची जोड देऊन प्रत्येक शिक्षकांनी आपल्या कौशल्याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
जि.प.उपाध्यक्ष म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढीमध्ये शिक्षकांचे कार्य हे मोलाचे आहे. यावेळी केलेले पुरस्काराची निवड पारदर्शक केली आहे. यापुढेही शिक्षकांनी तळमळीने काम करुन आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.

शिक्षक पुरस्कार वितरण
राज्य पुरस्कार प्राप्त : उदय पाटील(प्राथमिक), विलास जगदाळे (माध्यमिक), सावित्रीबाई फुले पुरस्कार विजयमाला बोधले यांचाही सपत्नीक सत्कार पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.
जिल्हा शिक्षक पुरस्कार विजेते :- प्राथमिक शिक्षक- श्री.दराडे शिवाजी, खेंदाड हरिश्चंद्र, हिरके नितीन, श्रीमती कांबळे पुष्पलता सिद्राम, श्री.भोसले संभाजी, पवार सुभाष,तेलंग विठ्ठल, श्रीमती तावरे सिंधु मोहन , माध्यमिक शिक्षक -श्री.शिंपले अशोक, तांबे राजू, तेलंग धनराज, गोरे चंद्रकांत, सोनवळकर राजेश तसेच विशेष शिक्षक म्हणून मुंडे सुनिल यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व साडी देऊन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण व मान्यवरांच्याहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी संपादिका श्रीमती संगीता भांडवले-रणदिवे यांनी 365 दिवसांचे दिनविशेष पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करुन सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वाटप केले. सर्व पुरस्कार प्रापत शिक्षकांच्या वतीने श्रीमती तावरे सिंधू मोहन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांनी सांगितले की, शिक्षकांना देण्यात आलेले शिक्षक पुरस्कार हे निवड समितीने अत्यंत पारदर्शक तपासणी करुन मुलांना दिलेली सेवा व गुणवत्तेच्या आधारे या पुरस्काराची निवड केली आहे. शिक्षकांनी टंचाईच्याकाळात केलेली मदत ही कौतुकास्पद आहे,असे सांगून पुरस्कार प्राप्त शिक्षकांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करुन करण्यात आली तर सांगता पसायदानाने केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी केले तर आभार वैजनाथ खांडके यांनी मानले.