देशाची तिजोरी - विडंबन
देशाची तिजोरी मंत्र्याचाच ठेवा
उघड टेंडर भावा आता उघड टेंडर भावा
घेऊ स्विस खाते भरुनी संपती देशाची
निवडणुकीत वाटलोय पैसा भिती रे कशाची
स्थिरावला हात तुझा मागे का हटवा
उघड टेंडर भावा आता उघड टेंडर भावा

निवणुकीत होतोय खर्च आता भरुनी घ्यावा
वर्षानुवर्षो आपल्या हातुनी घडो देशसेवा
मनी राहो तुझ्या-माझ्या इंग्रजांचा कावा
उघड टेंडर भावा आता उघड टेंडर भावा

निस्वार्थ जणू चौकावरचा पुतळा भासावा
नेत्यांनी सा-या कसा कार्यकर्ता पोसावा
बगलबच्चांनीही आपला जयजयकार करावा
उघड टेंडर भावा आता उघड टेंडर भावा
देशाची तिजोरी मंत्र्याचाच ठेवा

भगवंत सुरवसे
मो. 9763830982
 
Top