कुर्डुवाडी -: 'धर्म ही अफुची गोळी आहे, ती नशा वाढवते' असे मत तत्ववेत्ता कार्ल मार्क्स यांनी मांडले होते. मात्र याच्याही पुढे जात कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील अमर शेख या मुस्लीम बांधवाने गणरायाची प्रतिष्ठापना करुन सनातनवादयांच्या डोळयात अंजन घातले आहे.
भारतात जेवढी युध्दात मनुष्यहानी झाली नाही त्यापेक्षा कितीतरी पट जास्त मनुष्यहानी जातीय दंगलीत झालेली आहेत. हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय दंगली पेटवणाराही एक वर्ग आहे. उत्तर प्रदेशात मुझफ्फनगर येथे चालू असलेली दंगल हे त्याचेच उदाहरण आहे.
हिंदू-मुस्लीम यांच्यात ऐक्य करण्याचे अनेक प्रयत्न होतात. त्याचाच एक भाग म्हणून कुर्डुवाडीत आरमान महेबुब शेख (इयत्ता सहावी) व परवेझ शेख (इयत्ता तिसरी) यांनी आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यांच्या या कल्पनेला घरातील वडीलधा-यांनीही पाठिंबा देऊन गणपती विकत आणला. गणपतीला आकर्षक छोटेखानी विदयुत रोषणाई करुन आकर्षक सजावटही केलेली आहे. यासाठी कुठलीही वर्गणी गोळा न करता शेख कुटुंबियांनी स्वखर्चातून हे सर्व केलेले आहे. रोन दोनवेळा शेख कुटुंबीय गणपतीची आरती करतात. आरतीच्या ताटात निरंजन, कापूर, फुले, उदबत्ती, हिंदू धर्मियांप्रमाणे सर्व पूजा केली जाते. सोबत घरातील सर्व कुटुंबीय आरतीवेळी घंटी वाजून साथ-संगत देतात.
शेख कुटुंबिय गणपतीबरोबरच दिवाळी, बैलपोळा यासह इतर उत्सव साजरे करतात. शेख कुटुंबियाचे म्हणणे आहे की, देव सर्वांचा एकच आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्मियांनी गुण्या-गोविंदाने नांदावे. शेख कुटुंबियांचा हा विचार समाजासाठी आदर्शवत आहे.

* साभार - दै.पुढारी