नळदुर्ग -: विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त नळदुर्ग येथील महाराणा प्रताप गणेश मंडळाच्यावतीने शनिवार दि. 14 ते सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजीपर्यंत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नळदुर्ग येथील महाराणा प्रताप चौकात 'श्री' ची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळास नगरसेवक संजय बताले यांनी मुर्ती दिली असून शनिवार दि. 14 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता लिंबू चमचा, संगीत खुर्ची, स्लो सायकल, धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर दुपारी चार वाजता रांगोळी, सामान्यज्ञान स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये लहान-मोठे गट आहेत. तर सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता इयत्ता पाचवी ते दहावी गटाच्या विदयार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, श्री बसवेश्वर महाराज, श्री महाराणा प्रताप, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्पर्धेचे विषय राहणार आहेत. याचदिवशी इयत्ता तिसरी ते सातवीच्या विदयार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या स्पर्धकांना मंडळाच्यावतीने कप व शैक्षणिक साहित्य, पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. वरील स्पर्धा महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद रोड, नळदुर्ग येथे होणार आहे. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या उदघाटक नगरसेवक संजय बताले, कमलाकर चव्हाण, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे तर शुभहस्ते माजी जि.प. सदस्य गणेश सोनटक्के, नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले, यावेळी प्रमुख उपस्थिती सेवा दलाचे शहराध्यक्ष विनायक अहंकारी, कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय दळवी, डॉ. सत्यजित डुकरे आदीजण उपस्थित राहणार आहे.
तरी विदयार्थ्यांनी जास्तीत जास्त वरील स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सागर हजारी, उपाध्यक्ष शुभम हजारी, संतोष गहेरवार, कोषाध्यक्ष दिपक चौहान, सचिव अभिजित ठाकूर, खजिनदार मंगेश चंदेले, सहसचिव रवी ठाकूर, सल्लागार अतुल हजारी आदीने केले आहे.