महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ अंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख (14 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख (32 जागा), संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख (26 जागा), यंत्र अभियांत्रिकी विभाग प्रमुख (37 जागा), अणुविद्युत विभाग प्रमुख (38 जागा), धातुशास्त्र विभाग प्रमुख (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 27 सप्टेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.