माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अधिनस्त नागपूर व अमरावती विभागात छायाचित्रकार (1 जागा), कनिष्ठ ग्रंथपाल (1 जागा), कनिष्ठ लिपिक/ लिपिक टंकलेखक (7 जागा), सिनेयंत्र चालक (2 जागा), वाहनचालक (12 जागा), कॅमेरा अटेंडंट (1 जागा), शिपाई/संदेशवाहक (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोंबर 2013 आहे. यासंबंधीची माहिती dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.