सोलापूर   :  मुबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील कलम 142 अन्वये शक्तीदेवी नवरात्र उत्सव 2013 तसेच कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर शहरात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी दि. 13.10.2013 रोजी दसरा (विजया दशमी) निमित्त संपूर्ण दिवस सोलापूर शहरातील सर्व मद्य व ताडी दुकाने विक्रीसाठी बंद राहतील. दि. 17.10 2013 व 18.10.2013 या दोन्ही दिवशी कोजागिरी पौर्णिमा निमित्त सोलापूर ते तुळजापूर या मार्गावरील हॉ. शितल, हॉ. न्यू टायटन, हॉटेल आर्या व हॉटेल दर्शन धाबा ह्या अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद राहतील.  या आदेशाचे उल्लंघन करणा-या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्‍याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले आहे.       
 
Top