पांगरी : विनापरवाना दारू वाहतुक करणा-या गाडीसह दोन लाख रूपयांचा मुदेमाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना सोमवार दि. 21 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी पांगरी (ता.बार्शी) बसथानकावर घडली. दारूची बिगरपरवाना वाहतुक केल्याप्रकरणी एकाविरूदध पोलिसात गुन्हा दाखल करन्यात आला आहे.
संतोष किशोर ओमन (रा. आगळगांव, ता.बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या व घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीचे नांव आहे. संजय शुभाष पवार (रा.पांगरी) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी पुणे लातुर राज्यमार्गावर एम एच 13 ए 4262 या क्रुझर कंपनीच्या गाडीमधुन विनापरवाना दारूची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पांगरी पोलिसांनी पांगरी बसस्थानकावर गाडीची तपासणी केली असता गाडीत देशी दारूचे बॉक्स आढळुन आले. पांगरी पोलिसांनी गाडीसह दारू ताब्यात घेतली आहे. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्‍यात आला असून पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top